सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 77 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 20 Feb 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून रू.600 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 11,000 रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर, मटन विके्रता,यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1प्रकरणाची नोंद करून रू.1,000 वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 28 प्रकरणांची नोंद करून 5,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत मे. हॉटेल सेंटर सिटी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आली. धंतोली झोन अंतर्गत मे. समृध्दी कल्पना यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.जागृती स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत अहमद किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.अनीशत पार्टनर एलएलपी यांनी विनीपरवानगी फुटपाथ तोडल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.