नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार(ता.22 व23) शोध पथकाने 70 प्रकरणांची नोंद करून 36,200 रुपयाचा दंड वसूल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू. 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 10,500 रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर, मटन विके्रता,यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1प्रकरणाची नोंद करून रू.1,000 वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 34 प्रकरणांची नोंद करून 6,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. स्पेस असोसिएटस यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.श्रध्दा इंटरप्रायजेस यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. ज्योती इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मोहित मलानी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले.नेहरूनगर झोन अंतर्गत मे. युफोरिया रेस्टॉरेंट व मे. यश रेस्टॉरेंट यांनी अनधिकृत भूखंडावर हॉटेलचे उरलेले अन्न टाकल्यामुळे व मनपाचे शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.जय दुर्गा किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शाहु किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. तसेच मे.सिध्दीविनायक कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.