सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 59 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 24 Feb 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयांची वसुली करण्यात आली. दवाखाने,इस्पितळे,पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 2,000 वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 7,500 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1प्रकरणाची नोंद करून रू.1,000 वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. द रँकर्स अकादमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आली. तसेच परेश कानोरकर यांनी जुनी इमारत पाडतांना योग्य काळजी न घेतल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.साई प्लाझा-VI यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.रितेश किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. निमजे किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत अभिषेक मोहांदेकर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.