शैक्षणिक संस्थांना मजबूत जोडणी देण्यासाठी आपली बसची रूट क्र. ६६ सुरू
Date : 24 Feb 2026
विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच दैनंदिन प्रवाशांकडून येत असलेल्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत, या नव्या मार्गावर सुरुवातीला ३ बसगाड्या कार्यरत राहतील. या बस दर तासाला (१ तासाच्या अंतराने) धावतील.
रूट क्र. ६६ सकाळी ६:०० ते रात्री ८:०० या वेळेत कार्यरत राहून दररोज एकूण २२ फेऱ्या पूर्ण करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना दिवसभर सोयीस्कर व विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध होईल.
हा मार्ग पिपळा फाटा ते डिफेन्स कॉरिडॉर दरम्यान महत्त्वपूर्ण बस सेवा सुरु करणार असून खालील प्रमुख शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणांना जोडेल:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एस.टी. बसस्थानक (गणेशपेठ), बर्डी, मुंडले शाळा, शासकीय आयटीआय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, व्हीएनआयटी (VNIT), एलएडी महाविद्यालय, लॉ कॉलेज, एलआयटी कॅम्पस, विद्यापीठ परिसर, डिफेन्स क्षेत्र.
रूट क्र. ६६ च्या प्रारंभामुळे आपली बस सेवा सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पुढे नेत असून शैक्षणिक क्षेत्राला सहाय्य, तसेच नागपूरकरांना सुरक्षित, परवडणारी आणि कार्यक्षम प्रवास सुविधा उपलब्ध करून देत आहे.