नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.बुधवार(ता.25) शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 85,600 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू. 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 8,500 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयांची वसुली करण्यात आली.हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व र्निदेशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.50,000 वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने झोन अंतर्गत मे. सुरूचि महिला गृह उदयोग यांनी डिसेलटिंग चेंबर मध्ये उरलेले अन्न टाकल्यामुळे रू.50,000 वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. सहयोग हॉस्पीटल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले.तसेच प्रीती ठाकरे यांनी विनापरवानगी बोरवेल खणल्यामुळे व रस्त्यावर पाणि पसरविल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.नेहरूनगर झोन अंतर्गत मे. श्रीराम जानकी सेलिब्रेशन हॉल यांनी रस्त्यालगत हॉलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. लिटील मिलेनियम प्री-स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.दिनेश स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. करतार स्टील इंडस्ट्रीज यांनी रस्त्यालगत दुकानाचा जाळल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. रवि फुडस् यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.90,000 दंड वसुल केला.