नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.गुरूवार(ता.2६) शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 31,000 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद करून 15,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 5,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 28 प्रकरणांची नोंद करून 5,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. सेंटर पॉईंट हॉस्पीटल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. हाकीमी मॅन्शन बिल्डर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले.तसेच माय कम्प्युटर यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. डी.सी.गर्ल्स हॉस्टेल यांनी हॉस्टेलच्या बाहेर कचरा जाळल्यामुळे रू.5,000 दंड वसुली करण्यात आली. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल यांनी रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. अटलांटिक इंजिनियर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.40,000 दंड वसुल केला.