मा.महापौर यांच्या हस्ते मनपा "पिंक मॅराथॉन"च्या बोधचिन्हाचे अनावरण
Date : 26 Feb 2026
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मनपाद्वारे स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त "पिंक मॅराथॉन"चे आयोजन करण्यात येणार आहे. मॅराथॉन तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी 3 किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर दि. ०७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी ४ ते ७ या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे. " >
मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री.प्रदीप पोहणे, नगरसेविका श्रीमती दुर्गेश्वरी कोसेकर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मनपाद्वारे स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त "पिंक मॅराथॉन"चे आयोजन करण्यात येणार आहे. मॅराथॉन तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी 3 किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर दि. ०७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी ४ ते ७ या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे.