मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात पद्मश्री जनार्दनपंत बोथे, सत्यनारायण नुवाल, डॉ. विलास डांगरे यांचा सत्कार
Date : 28 Feb 2026
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल तसेच सर्व आमदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित केला जात आहे. सोमवार २ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मनपा मुख्यालयात हा भव्य सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांच्यासह मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाचे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करीत आहे.
“पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला २ मार्च २०२६ रोजी ७५ पूर्ण वर्षे होत आहेत. गत ७५ वर्षात शहराच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी महापौर, उपमहापौर यांचा सन्मान करण्यात यावा, हयातीत नसलेल्या पदाधिकारी यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात येत आहे.