मनपाच्या शाळांनी केला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
Date : 28 Feb 2026
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मागील ८ दिवसांमध्ये मनपाच्या विविध शाळांमध्ये यंग कलाम डिस्कवरी सायन्स सेंटर च्या वतीने विविध स्पर्धाव विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच विज्ञानावर आधारित विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस यंग कलाम डिस्कवरी सायन्स सेंटर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात इंग्लंड येथील डेव्हिड प्राइस यांनी “जगा भोवतालचे विज्ञान ” या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंमधून विज्ञान कसे शिकता येते याचे प्रात्यक्षिक त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले असता त्यांनी अत्यंत सोप्या व रंजक पद्धतीने उत्तरे दिली. अनेक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या शाळेतून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
दुसऱ्या सत्रात शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर येथील प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ . शितल देशमुख यांनी “विज्ञनामध्ये महिलांचे योगदान आणि विज्ञान क्षेत्रात संधी ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत वाल्मिकीनगर मनपा शाळेच्या पुष्पलता गावंडे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच मनपाच्या विविध शाळांतील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ७ शाळांमधील निवडक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सुरेंद्रगड हिंदी हायस्कूल, जैताला हायस्कूल, एम. ए. के. आझाद उर्दू हायस्कूल, पीएम श्री संजयनगर हिंदी हायस्कूल, वाल्मिकी नगर हिंदी हायस्कूल, पीएम श्री लाल बहादूर शास्त्री हायस्कूल आणि विवेकानंदनगर हिंदी हायस्कूल या शाळांचा समावेश होता.
आजचा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी एच . सी. एल.च्या स्वयंसेवकांनी मोलाची मदत केली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विज्ञान केंद्राचे श्री. कालिदास नाकाडे व श्री. निखिल लक्षणे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन स्वाती जोशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कालिदास नाकाडे यांनी केले.