मनपाची रविवार ८ मार्च रोजी भव्य 'पिंक मॅराथॉन'
आज मिळणार टी-शर्ट :स्त्री-शक्तीचा होणार जागर, तीन गटात स्पर्धा
Date : 06 Mar 2026
मनपातर्फे स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी, आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारी ही विशेष ‘पिंक मॅराथॉन’ महिलांसाठी समर्पित आहे. मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात 8 मार्च रोजी पिंक मॅराथॉन आयोजित करण्यात आली आहे. पिंक मॅराथॉनला महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विधान परिषद सदस्य मा. आमदार श्री. अभिजित वंजारी, श्री. कृपाल तुमाने, श्री. सुधाकर अडबाले, श्री. संदीप जोशी, डॉ. परिणय फुके, डॉ. नितीन राऊत, श्री. कृष्णा खोपडे, श्री. मोहन मते, श्री. विकास ठाकरे, श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लीला अजय हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी- वखरे, सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शनी धवड, प्रामुख्याने उपस्थित राहतील. याशिवाय मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. यांची देखील पिंक मॅराथॉनला विशेष उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाच्या क्रीडा विभाग आणि समाज विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक मनपा च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर ७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी 4 ते 7 या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे. पिंक मॅराथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले.
' पिंक मॅराथॉन' स्पर्धा तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी ३ किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे.
सर्वसामान्य गटासाठी आयोजित करण्यात येत असलेली ५ किमी ची मॅराथॉन ही यशवंत स्टेडियम-महाराष्ट्र बँक चौक-झांसी राणी चौक-विद्यापीठ लायब्ररी चौक-अलंकार टॉकीज चौक- कच्छीपुरा चौक-दीक्षाभूमी अण्णाभाऊ साठे चौक-रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन चौक-रहाटे कॉलनी गोरक्षण सभा चौक-होमगार्ड ऑफिस–धंतोली उद्यान-मेहाडिया चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.
तसेच १६ वर्षांखालील महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ३ किमी ची मॅराथॉनची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून होणार असून पुढे महाराष्ट्र बँक चौक- झांसी राणी चौक- विद्यापीठ लायब्ररी चौक- कल्पना बिल्डिंग- लोकमत चौक – धंतोली उद्यान- मेहाडिया चौक येथे पोहचले तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त समाप्त होईल.
विशेष पिंक रन ही २ किलोमीटर मार्ग यशवंत स्टेडियम- महाराष्ट्र बँक चौक - झांसी राणी चौक - विद्यापीठ लायब्ररी चौक- पंचशील चौक - मेहाडिया चौक येथे पोहचेल यशवंत स्टेडियम तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.