लोकाभिमुख अर्थसंकल्पासाठी नागरिकांचे मत जाणून घेणार, सर्व झोनमध्ये अर्थसंकल्पीय सूचना पेटी सज्ज
महापौर,स्थायी समिती सभापती व सत्तापक्ष नेते यांच्या हस्ते सूचना पेटीचे लोकार्पण
Date : 06 Mar 2026
स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेमध्ये हा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. सर्व झोन स्तरावर येत्या १५ मार्च पर्यंत राहणाऱ्या या सूचना पेट्यांमध्ये नागरिकांनी ’माझे शहर’ म्हणून आपले अमुल्य मत नोंदवावे आणि शहराच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केले आहे. तसेच नागरिकांच्या सहभागातून अर्थसंकल्प तयार करण्याची येणार असून, प्रत्येक झोनमध्ये मतपेटी ठेवून नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता महाविद्यालय आणि विविध संस्थां व्यापारी संघटनांना भेट देऊन त्यांच्याकडून देखील अभिप्राय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन अभिप्राय नोंदवा
नागरिक मतपेटी जवळ लावण्यात आलेल्या क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन देखील आपले अभिप्राय नोंदवू शकतात, तरी त्यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी आपले अमुल्य मत द्यावे असे आवाहनही श्रीमती दाणी-वखरे यांनी केले.