महिला दिनानिमित्त मनपा बजेटवर विशेष चर्चा
महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वात महिलांकडून अपेक्षा व अभिप्राय जाणून घेणार
Date : 08 Mar 2026
या चर्चासत्रात महिला अधिकारी, सनदी अधिकारी यांच्या सौभाग्यवती तसेच शहरातील खासदार व आमदार यांच्या सौभाग्यवती यांना निमंत्रित करण्यात आले असून, नागपूर महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या अपेक्षा व अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने महिलांच्या सूचनांना व विचारांना स्थान मिळावे, तसेच महिलांच्या दृष्टीकोनातून शहरातील गरजा आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
“नागपूर शहराच्या विकासात महिलांचा सहभाग आणि त्यांच्या सूचनांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आगामी मनपा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख व सर्वसमावेशक व्हावा यासाठी महिलांचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ. शिवानी दाणी वखरे यांनी दिली.