मनपातर्फे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन
Date : 12 Mar 2026
नागपूर महानगरपालिकातर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, तथा देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त बुधवारी (ता.१२) विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महापौर दालनापुढे आयोजित छोटेखानी समारंभात मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.
Back To Home Page
याप्रसंगी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्री. वैष्णवी बी., नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. शैलेश जांभूळकर यांनी सुद्धा पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तत्पूर्वी अजनी चौकातील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण केला मनपातर्फे अभिवादन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. तानाजी वनवे, श्री. दिलीप पनकुले, श्री. अनिल अहिरकर, श्री.राजाभाऊ टाकसाळे यांच्यासह इतर उपस्थित होते.