मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके वेळेवर देण्याच्या सूचना
शिक्षण सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा
Date : 12 Mar 2026
या बैठकीत शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्रीमती सीमा खोब्रागडे, श्री. संजय दिघोरे, यूआरसी समन्वयक श्री. संजय भाटी, श्री. राजेंद्र धायटे, श्रीमती मनीषा वंजारी, समग्र शिक्षा अभियान विभागाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती कविता पिवळतकर, श्री. योगेश चक्रे आणि श्री. राहुल जोंधळेकर उपस्थित होते.
या बैठकीत नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या यूआरसी (Urban Resource Centre) झोन क्रमांक 3,4 आणि 5 च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या पाठ्यपुस्तकांची आणि गणवेशाची उपलब्धतेबाबत सर्व शाळांकडून आवश्यक मागणीची समीक्षा करण्यात आली.
सर्व शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आणि गणवेश या दोन्ही गोष्टींची पूर्ण मागणी प्राप्त झाली आहे का आणि त्यानुसार आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे का, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
तसेच,महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) द्वारे प्रकाशित पुस्तकांच्या छपाईसाठी वेळेत आदेश जारी करावेत आणि विद्यार्थ्यांच्या गणवेशाची व्यवस्थाही विहती मुदतीत वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी दिले.