मनपाच्या नारी शक्तीचा सन्मान : मा. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
मनपा महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि खेळ रंगले
Date : 12 Mar 2026
याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड,जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे, श्रीमती सीमा ढोमने, श्रीमती शारदा सुरेश बारई, श्रीमती रजनी वानखेडे, श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती तसनिस परविन नियामत खान काजी, झोनचे सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, विभागीय अधिकारी श्री.आनंद खोडस्कर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा सत्कारच नव्हे, तर त्यांच्याकरिता संगीत खुर्ची आणि मटका फोड यांसारख्या खेळ आयोजित करण्यात आले. या खेळांत महिला सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग महिलांनी आनंद लुटला. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार मा. महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कारामुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले व त्यांच्या योगदानाचा समाजासमोर गौरवपूर्ण सन्मान झाला. महिला सक्षमीकरण आणि स्वच्छतेबाबत जनजगृतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हा कार्यक्रम एक स्तुत्य पाऊल ठरले.