नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.शुक्रवार(ता.13) शोध पथकाने 86 प्रकरणांची नोंद करून 50,300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 33 प्रकरणांची नोंद करून 13,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत16 प्रकरणाची नोंद करून 6,400 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू. 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 17,500 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे 1प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.क्रिस्टलाईन इंफ्रा प्रा.लि. यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. तथास्तु आरएल बिल्सकॉन यांनी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.तारा एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे.सिल्व्हर सेक्युरिटी सोल्युशन यांनी जनतेच्या तक्रारीवरून दुकानाच्या विरोधात कारवाई केल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. शौर्या डिफेंस करियर अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. मुरलीवाला कॅफे अँड रेस्टॉरंट व मे. सावजी हॉटेल यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 याप्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. हरे क्रिष्णा स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.तारा प्रीमियम एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.