सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 84 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 16 Mar 2026
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार व सोमवार(ता.15 व 16) शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 49,500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 30 प्रकरणांची नोंद करून 12,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.300 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत16 प्रकरणाची नोंद करून 6,400 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू. 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 9,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे वयवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटींग चेंबर नसणे,चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून 3,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Back To Home Page
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.संगम रेस्टॉरेंट यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यालगत टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच तेजस पटेल यांनी रस्त्यालगत अनधिकृतरित्या टीनशेड टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. द रँकर्स अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सदगुरू ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू.20,000 दंड वसुल केला.