आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला सामान्य प्रशासन अन् विधी विभागाचा आढावा
Date : 17 Mar 2026
मनपातील आयुक्त सभाकक्षात पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी, मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री सदाशिव शेळके, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री निर्भय जैन, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, श्री. राजेश भगत, श्री.गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, डॉ श्वेता बॅनर्जी, विधी अधिकारी श्री. सुरज पारोचे व इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपायुक्त श्री निर्भय जैन यांनी नवीन आकृतिबंधानुसार विभागांची रचना आणि समायोजित विभागाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मनपाच्या वर्ग एक ते चार पर्यंत एकूण २०५ संवर्ग असून, यात एकूण मंजूर पदे १७,९८१ आहेत. सध्या ९३२२ कार्यरत पदे असून, ८६५९ पदे रिक्त आहे. मनपाला साधारणतः १९ अधिकारी प्रतिनियुक्ती वर शासनाकडून हवे आहे. तसेच सरळ सेवेतून गट अ , ब आणि ड मध्ये भरती करायची आहे. आयुक्तांनी राज्य स्तरावर प्रलंबित असलेल्या भरती आणि प्रतिनियुक्ती बद्दल प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचेही आदेशित केले. तर विधी अधिकारी श्री. सुरज पारोचे यांनी विधी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाची तपशीलवार माहिती दिली. त्यांनी विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती दिली.