नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.बुधवार(ता.18) शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद करून 21,300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.300 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 2,400 रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 3,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे वयवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशान्वये व निर्देशा अंतर्गत विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही करणे या अंतर्गत 1प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 2,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.केमेस्ट्री विझार्ड यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.शिवानी हॉटेल यांनी हॉटेलचे सांडपाणी रस्त्यालगत सोडल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.रोकडे ज्वेलर्स, मे. गायत्री कंस्ट्रक्शनस् व मे.हँगश्युअर हॉस्पिटॅलिटी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू. 10,000 या प्रमाणे रू. 30,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. ए.एस.कार वर्क्स अँड पेंटींग यांनी रहिवासी परिसरा मध्ये वायु प्रदूषण पसरविल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. द अचिव्हर्स स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. शिवशक्ती किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. गणेश किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हॉटेल पराशर चेक-इन यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.