नागपूर मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (MSU) यांच्या वतीने आयडीएसपी, व्हीपीडी व एनपीसीसीएचएच विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Date : 21 Mar 2026
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील विविध अधिकारी व कर्मचारी यांना रोगनियंत्रण, देखरेख आणि अहवाल प्रणाली अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नागपूर महानगरपलीकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या हस्ते उद्घाटनपर मार्गदर्शन झाली असून प्रशिक्षणामध्ये IDSP/IHIP परिचय, P & L फॉर्म्स केस परिभाषा , IHIP पोर्टल, उष्माघाताशी संबंधित आजार व रेफरल प्रणाली, VPD सर्व्हेलन्स, Active Case Search आणि CIF भरणे यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रोगनियंत्रण आणि सर्व्हेलन्स प्रणालीबाबतची क्षमता अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास नागपूर महानगर पलीकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुहास गजभिये , एम.एस.यू चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे,सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ मिथुन खेरडे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. संदीप भोयर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी, तांत्रिक अधिकारी श्री.हर्ष वर्धन चंदेल आदी तज्ञ अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रशिक्षणाचे व्यवस्थापन एम. एस. यू चे प्रशिक्षण व्यवस्थापक व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी वाघे यांनी केले असून प्रशिक्षण समन्वय म्हणून संशोधन सहाय्यक कु.अश्विनी पटेल यांनी जबाबदारी सांभाळली.
तसेच नमुना संकलन पाठविणे व ट्रॅकिंग, आवश्यक फॉर्म व कागदपत्रे भरण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. दुपारनंतर NPCCHH पोर्टलचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच कुष्ठरोग विषयक माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा नागपूर चे कुष्ठरोग तज्ञ् डॉ. दीपिका साकुरे व शाझिया शम्स (ADHS, Leprosy) यांच्याकडून देण्यात आली . प्रशिक्षणादरम्यान सहभागींची माहिती तपासण्यासाठी Pre-test आणि Post-test घेण्यात आली आहे.
यावेळी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, कुष्ठरोग तज्ञ् डॉ.वर्षा देवस्थळें, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डेटा विश्लेषक श्री. सौरभ नाखले, सवांद तज्ञ श्री. स्नेहल करंजेकर, बहुउ्देशीय सहाय्य्क श्री. नाशिक वालदे उपस्थित होते.