.गुढीपाडव्याच्या निमित्ताने १०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण
Date : 21 Mar 2026
कार्यक्रमाचे उद्घाटन स्व. प्रभाकरराव दटके स्मृती संस्थाचे अध्यक्ष मा. डॉ. राऊत,म.न.पा चे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. डॉ. नरेंद्र बहीरवार, झोनल वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. विजय तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते १०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी स्मृती संस्थाचे अध्यक्ष डॉ. राऊत यांनी समाजाप्रती आपले काही देणे लागते या भावनेतून प्रत्येकाने “निक्षय मित्र” बनून क्षयरुग्णांना मदत करण्याचे आवाहन केले. “फुल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेने समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.पियुष बागडे, श्री.रणजीत राठोड, श्री.चंदू निपाणे, श्री.श्याम चांदेकर, श्री. सुबोध आचार्य, श्री.रूपेश सावंत, श्री.विवेक धाक्रस,श्री. राजेश कान्हेरे, डॉ.मोकुलवार यांनी पुढील काळात आणखी १०० क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाला मनपाचे मा. अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार , मा.झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी, DPS समन्वयक श्री. उत्तम मधुमटके, जि. पी. पी. एम. समन्वयक श्रीमती संगिता शिंगणे, STS श्रीमती नेहा सोनटक्के ,TBHV श्रीमती पूजा जोशी तसेच क्षयरोग कर्मचारी व उपचार घेत असलेले रुग्ण, तसेच कार्यक्रमाला स्व. प्रभाकरराव दटके स्मृती संस्थेचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. पियुष बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.