लोकनेता हरपला - महापौर निता ठाकरे
Date : 22 Mar 2026
गेल्या पाच दशकापासून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटविणारे लोकनेते व माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनाने लोकनेता हरपला आहे, अशा शब्दात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
Back To Home Page
दत्ता मेघे यांनी अत्यंत कठिण परिस्थितीला सामोरे जात राजकीय क्षेत्रात एक लोकनेता म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी विदर्भासह महाराष्ट्रात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यांनी नेहमीच गरीब व वंचित समाजाचे राजकारण करीत राजकीय क्षेत्रात एक अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याचे महापौर श्रीमती ठाकरे यांनी शोक संदेशात भावना व्यक्त केल्या आहेत.