उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा : महापौर निता ठाकरे
आरोग्य विभागाद्वारे नागपूर सिटी हीट अॅक्शन प्लॅन २०२६’ महापौरांपूढे सादर
Date : 23 Mar 2026
मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित नियामक समितीच्या पहिल्या बैठकीत मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या पुढे नागपूर सिटी हीट अॅक्शन प्लॅन २०२६’ सादर करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकांना उष्माघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मा.स्थायी समिती सभापती श्रीमती. शिवानी दाणी वखरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत, आरोग्य समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती. सारिका नांदुरकर, गल्लीच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती श्रीमती. ऋतिका मसराम, शिक्षण समिती सभापती श्रीमती. संतोषदेवी लढ्ढा उपस्थित होत्या.
बैठकीत उन्हाळ्यात उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती उपक्रम तसेच आरोग्य यंत्रणेची तयारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, चौकाचौकात व विशिष्ट ठिकाणी वाटर ईटीएम किंवा वाटर फिल्टर लावणे, सावलीची सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सेवा उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांमध्ये उष्माघाताबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी संबंधित विभागांना दिले.
यावेळी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये आणखी सुधारणा करण्यात यावी अशा सूचना केली. आरोग्य समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी शेल्टर होम” बेघर निवारा गृहांची संख्य वाढवावी तसेच स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजन राबविण्यासाठी सूचनांची झोन निहाय यादी तयार करण्याच्या सूचना केली. तर जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे आणि शिक्षण समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी आपल्या सूचना मांडल्या.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी शहरात ग्रीन नेटची व्यवस्था, हेल्पलाईन क्रमांक सुरू करणे तसेच विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तर “हीट अॅक्शन प्लॅन”चे सादरीकरण करताना उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यात नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याचे सांगितले. तर आभार देखील साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड,एन.यू.एच.एम.चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, पी.एच.एन. श्रीमती अर्चना खाडे, श्रीमती दिपाली नागरे, कनिष्ठ लिपीक श्री. प्रदीप कुंभारे, एम.एस.यू.चे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथून खेरडे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. शुशांकी कापसे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. पवन चनकापुरे, डेटा व्यवस्थापक श्रीमती. हिमाक्षी वानखेडे, संवाद तज्ञ श्री. स्नेहल करंजेकर तसेच इतर संबंधित अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.