शोभायात्रा मार्ग स्वच्छ व सुलभ करण्याचे कार्य प्रगतीपथावर
Date : 24 Mar 2026
काही दिवसांपूर्वी मा.आमदार श्री. प्रवीण दटके आणि आयुक्त डॉ.विपीन यांनी शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी करीत मार्गावर आवागमन सुलभ व्हावे, मार्गाची स्वच्छता सुनिश्चित करण्यात यावी असे निर्देशित केले होते त्यानुषंगाने विभागाद्वारे कार्य केले जात आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी जुन्या भंडारा रोड परिसरात भेट देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामे अधिक वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून भाविकांना कोणतीही अडचण न येता सहजपणे आवागमन करता यावे याकरिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यांची स्वच्छता केली जात असून, शोभायात्रेच्या मार्गावरील कचरा, धूळ आणि अडथळे दूर करण्यात येत आहेत. याशिवाय, मार्गावरील स्वच्छता कायम राखण्यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.