सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 24 Mar 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.भारतीय एअरटेल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.पार्क वन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.आर संदेश बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. सुयश किंडरगार्डन अँड पब्लिक स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. माता अनुसया सभागृह यांनी रस्त्यालगत हॉलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अरविंद किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. सातपुते किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. युनीटॉटस प्री स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मोहम्मद अल्ताफ यांनी बांधकामामुळे चेंबर तोडल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच प्रेम रूपचंदानी यांनी फुटपाथवर अनधिकृतरित्या टिनशेड उभारल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. ग्रँड एक्झीबिशन पंडत पैठणी व मे. झरोका गुलबहार एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 12 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 दंड वसुल केला.