जागतिक क्षयरोग दिनानिमित्त WCL मुख्यालयात क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Date : 25 Mar 2026
या कार्यक्रमाला झंकार महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रीना पांडे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती श्रुती परांजपे याही उपस्थित होत्या. शिबिरात एकूण १२० लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान आपला क्षयरोग उपचार यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या दोन रुग्णांना ‘TB चॅम्पियन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘निक्षय योजना’ अंतर्गत झंकार महिला मंडळाने ७ क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना उपचारादरम्यान आवश्यक सहाय्य देण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर (MOH), शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार (CTO), झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका यावलकर, तसेच वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अरविंद चव्हाण,संगीता शिंगणे मॅडम सुवर्णा मॅडम आणि वैभव सर (IGRTU) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन WCL मुख्यालयाच्या प्रभारी CMO डॉ. छाया केदारे यांनी केले. कार्यक्रमाद्वारे क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच वेळेवर निदान आणि नियमित उपचार यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अरविंद चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.