जनगणना-२०२७ कामकाजात गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Date : 25 Mar 2026
जनगणना-२०२७ हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय काम असून संबंधितांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, नियुक्ती होऊनही काही अधिकारी व कर्मचारी कार्यात रुजू झाले नसल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. धरमपेठ झोन कार्यालयाकडून अशा गैरहजर प्रगणक व पर्यवेक्षकांविरुद्ध शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार, संबंधित शाळा, महाविद्यालये, निमशासकीय व विनाअनुदानित संस्था तसेच शासकीय व केंद्र शासकीय कार्यालयांच्या विभागप्रमुखांना तातडीने आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित आपल्या नियुक्त ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा शासकीय नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. महानगरपालिकेने सर्व संबंधितांनी सहकार्य करून जनगणना कार्य सुरळीतपणे पार पाडावे, असे आवाहन धरमपेठ झोन चे सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांनी केले आहे.