शिक्षण विशेष समिती सभापतींनी घेतला मिड-डे मील योजनेचा आढावा
Date : 26 Mar 2026
बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना वेळेवर, स्वच्छ, पौष्टिक व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित संस्थांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, पोषणमानके व वितरण प्रक्रियेत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत वेळेवर अन्न पोहोचावे व वितरण प्रक्रिया शिस्तबद्ध व सुयोग्य पद्धतीने पार पडावी, यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लढ्ढा यांनी सर्व संस्थांना स्पष्टपणे निर्देश दिले की विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. श्रीमती संतोष लढ्ढा यांनी पुढे असेही नमूद केले की आगामी काळात नियमित पाहणी व आढावा बैठकींद्वारे कामांची गुणवत्ता तपासली जाईल. सर्वांच्या उपस्थितीत ही बैठक अत्यंत सकारात्मक व परिणामकारक ठरली असून, मिड-डे मील योजनेच्या सुरळीत, पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले.