नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.शुक्रवार(ता.27) शोध पथकाने 57 प्रकरणांची नोंद करून 29,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू. 400 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचेहॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स,सर्व्हिस प्रोव्हायडर, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5प्रकरणांची नोंद करून 10,000 रूपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.एस.बी.कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.कोझी ब्लिस बी अँड बी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.नेहरूनगर झोन अंतर्गत मे. रूट 49 बार अँड रेस्टॉरेंट यांनी अनधिकृत भूखंडावर हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.तसेच मे.रॉयल मिना बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सतनाम किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.धावळे किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.