गणेश मंदिर, नातीक चौक ते एम्प्रेस मॉलपर्यंतच्या वॉकिंग ट्रॅकचे काम लवकर सुरू करा
आमदार प्रवीण दटके, आयुक्त डॉ. विपीन यांनी केली गांधीसागर तलावाची संयुक्त पाहणी
Date : 28 Mar 2026
मनपाच्या सर्व साधारण सभेत ज्येष्ठ नगरसेवक श्री. बंडू राऊत आणि श्री. मनोज साबळे यांनी गांधीसागर तलावाचे उर्वरित काम बंद असल्याचे माननीय महापौर यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानुषंगाने महापौरांनी या तलावाची पाहणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, मनपा आयुक्त यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार श्री प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, ज्येष्ठ नगरसेवक श्री बंडू राऊत, श्री मनोज साबळे, अधीक्षक अभियंता डॉ श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री राजेश दुफारे, श्री अनिल गेडाम, श्री राजेंद्र राठोड यांच्यासह इतर अधिकारी वकर्मचारी उपस्थित होते. आमदार श्री. दटके आणि आयुक्त डॉ विपीन यांनी तलावाची सर्व बाजूनी पाहणी केली. तसेच त्यांनी शिकस्त भिंतीचे काम आणि खाऊ गल्लीबद्दलची कामे सुरू करण्यासह नागरिकांच्या सोयीसाठी फाऊंटन आणि लाईट शो सुद्धा येथे सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी आमदारांचा आणि आयुक्तांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.