महापालिका शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी मनपाचा मोठा निर्णय; आगामी सत्रात इंग्रजी शिक्षकांची भरती व सेमी-इंग्रजीचे वर्ग
Date : 31 Mar 2026
महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीत शाळांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक मशीन तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
* गणवेश व साहित्याची तपासणी: विद्यार्थ्यांना दिले जाणारे युनिफॉर्म, शूज आणि सॉक्स यांचा दर्जा तपासूनच खरेदी केली जाईल.
* व्याकरण पुस्तकांचे वाटप: इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्याकरणाची (Grammar) पुस्तके उपलब्ध करून दिली जातील.
* पटनोंदणी मोहीम: शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी पालकांची माहिती व मोबाईल क्रमांकासह विशेष नोंदणी रजिस्टर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीला उपसभापती श्रीमती भारती विकास बुंदे, सदस्य श्री. विनय विवेक दाणी, श्रीमती वैशाली विलास उदापूरकर, श्री. अंकित खुनंदन चौधरी, श्रीमती कांचन सतीश चव्हाण, श्रीमती वर्षा बंडू डोंगरे यांच्यासह उपायुक्त (शिक्षण) डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सिमा खोब्रागडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.