जागतिक जल दिन 2026’ निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व जल जनजागृती उपक्रम
Date : 01 Apr 2026
या उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या विविध झोनमधील शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये वाल्मिकी गांधी नगर शाळा, येंडावडी शाळा, कपिल नगर शाळा , शास्त्री नगर माध्यमिक शाळा, गायत्री कॉन्व्हेंट शाळा आणि जयताळा शाळा या शाळांचा समावेश होता.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये “जल है तो कल है ” हा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व जलस्रोतांचे संरक्षण करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अन्न सुरक्षा तज्ञ डॉ. अनुजा मैत्रेय यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. शुशांकी कापसे, प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सनी मगर, तांत्रिक अधिकारी हर्ष चंदेल, संशोधन सहाय्यक कु.अश्विनी पटेल, संवाद तज्ञ श्री. स्नेहल करंजेकर, डेटा व्यवस्थापक श्रीमती. हेमाक्षी वानखेडे, बहुउद्देशीय सहाय्यक श्री. नाशिक वालोदे उपस्थित होते.