प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 15 दिवसांची मुदतवाढ
15 एप्रिलपर्यंत लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा
Date : 01 Apr 2026
मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व आयुक्त डॉ. विपीन यांच्या देखरेखीत नागरिकांना परवडणाऱ्या घरे योजनेअंतर्गत 1 बीएचके व 2 बीएचके स्वप्नपूर्ती घरकुल योजना मौजा-नारी भागात उभारण्यात येणार आहे. 1 बीएचके स्वप्नपूर्ती घरकुल 350.37 चौरस फूट तर 2 बीएचके घरकुलाचे 484.38 चौरस फूट इतके चटई क्षेत्रफळ राहणार आहे. यात 1 बीएचके घरकुल 210 तर 2 बीएचके घरकुलांची संख्या 308 राहणार आहे. यात अनुसूचित जाती – जमाती व इतर मागासवर्गीयांना नियमाप्रमाणे आरक्षण लागू राहणार आहे.
1 बीएचके घरकुलाची किंमत, 15 लाख 51 हजार 672 रुपये आहे. तर 2 बीएचके घरकुल 21 लाख 1 हजार 748 रुपयांना उपलब्ध होणार आहे. या दोन्ही घरकुलांसाठी शासनातर्फे देण्यात येणार्या 2 लाख 50 हजार रुपयांच्या अनुदानाला लाभार्थी पात्र ठरणार आहे.
अर्जासाठी पात्रता
1. अर्जदार नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
2. अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबीयाच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे.
3. अर्जदार तथा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
4. अर्जदार तथा कुटुंबाने मागील 20 वर्षात शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेसाठी लाभार्थींनी मनपाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज नोंदणी करण्यात अडचणी आल्यास अर्जदारांनी 8855888374, 8855888574 किंवा 8956652170 या मोबाईल क्रमांकावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.