सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 87 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 01 Apr 2026
रविवार आणि सोमवार (ता. 22 आणि 23) रोजी शोध पथकाने 87 प्रकरणांची नोंद करून 44,300 रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400 दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून10,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टकाणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600रुपयांची वसुली करण्यात आली.
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6,000रुपयांची वसुली करण्यात आली.
दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यांदींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.2000 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.2000दंड) या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 6,500 रुपयांची वसुली करण्यात आली.
वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.1000दंड) या अंतर्गत1प्रकरणाची नोंद करून1000 रुपयांची वसुली करण्यात आली.
सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावून कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000रुपयांची वसुली करण्यात आली.
हॉटेल मध्ये डिसेलटींग चेंबर नसने, चौक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी टाकणे 1 प्रकरणांची नोंद करून 5,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास(रु.200 दंड) 26 प्रकरणांची नोंद करून 5,200 रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच धरमपेठ झोन अंतर्गत मे. आरआय क्रिऐशन, अभ्यंकरनगर यांनी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याने 10,000 रुपयांचा दंड वसूल केला.
धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील स्थानिक दुकानद यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियम 2006 अंतर्गत 5,000 रुपयांचा दंड वसुल केला.
नेहरुनगर झोन अंतर्गत मे. मनोहर साऊजी होटल, क्वॉटन मार्केट, यांनी मनपा चेंबर ब्लॉक करुन होटलमधील घाण टाकल्याप्रकरणी 5,000 रुपयांचा दंड वसुल केला.
गांधीबाग झोन अंतर्गत मे. पुरुषोत्त्त किराणा स्टोर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियम 20226 अंतर्गत 5,000 रुपयांचा दंड वसुल केला.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. लोखंडे किराणा स्टोर्स, घाट रोड यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल म महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियम 20226 अंतर्गत 5,000 रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. अबॅसस एमएस अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी 5,000 रुपयांचा दंड वसुल केला.
मंगळवारी झोन अंतर्गत मे.हॅप्पी होम सर्विस, गिट्टीखदान यांनी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी 5,000 रुपयांचा दंड वसुल केला.
उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000 रुपयांचा दंड वसूल केला.