“इनोव्हेट फॉर नागपूर सिटी!”
उन्हापासून बचावासाठी सोलर शेडची अनोखी स्पर्धा अभियांत्रिकी विद्यार्थी, प्रोफेशनल, डिझायनर्स व कन्सलटंटकडून मागविल्या डिझाईन
Date : 02 Apr 2026
सिग्नल असलेल्या गर्दीच्या चौकात सोलर रूफटॉप उभारण्यातून चौकात उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव तर होईल त्याचप्रमाणे सोलरच्या पॅनेलमधून विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला सुद्धा हातभार लागणार आहे. यावर जाहिरातदारांना साईन बोर्ड लावण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. या स्पर्धेकरिता अर्ज करण्याची मुदत ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ असून, निवडक डिझाइनचे सादरीकरण २४ एप्रिल २०२६ रोजी मनपा मुख्यालयात होणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके यासंदर्भात लोकांकडून संकल्पना याव्या, लोकांच्या कल्पनांना शहराच्या उभारणीत सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने मनपाच्या वाहतूक विभागातर्फे यासाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील इंजीनिअरिंगचे विद्यार्थी, प्रोफेशनल, डिझायनर्स व कन्सलटंटने या स्पर्धेत सहभागी होऊन नव्या संकल्पना मनपाला सादर कराव्या. यासाठी पहिल्या विजेत्याला 25 हजार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 21 हजार व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 17 हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.
कॉफी विथ मेयर या स्पर्धेतील विजेत्यांसोबत नागपूर शहराच्या प्रथम नागरिक माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्यासोबत कॉफी विथ मेयर या कार्यक्रमात या संकल्पनेबाबत चर्चा करण्याची संधी विजेत्यांना मिळणार आहे. या अभिनव संकल्पनेत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, मनपाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना साकार करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच आपले डिजाईन eetrafficnmc01@gmail.com वर पाठवावे. नागपूरला अधिक 'स्मार्ट' आणि 'ग्रीन' बनवण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केले आहे. " >
नागपूरमधील रणरणत्या उन्हापासून वाहनचालकांचा बचाव करण्यासाठी मा. महापौर श्रीमती निता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी 'सोलर रूफटॉप शेड' स्पर्धेची संकल्पना बैठकीत मांडली होती. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड,सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत उपस्थित होते त्यांच्या सूचनेनुसार मनपाच्या वाहतूक विभागाद्वारे अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
सिग्नल असलेल्या गर्दीच्या चौकात सोलर रूफटॉप उभारण्यातून चौकात उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव तर होईल त्याचप्रमाणे सोलरच्या पॅनेलमधून विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला सुद्धा हातभार लागणार आहे. यावर जाहिरातदारांना साईन बोर्ड लावण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. या स्पर्धेकरिता अर्ज करण्याची मुदत ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ असून, निवडक डिझाइनचे सादरीकरण २४ एप्रिल २०२६ रोजी मनपा मुख्यालयात होणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके यासंदर्भात लोकांकडून संकल्पना याव्या, लोकांच्या कल्पनांना शहराच्या उभारणीत सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने मनपाच्या वाहतूक विभागातर्फे यासाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील इंजीनिअरिंगचे विद्यार्थी, प्रोफेशनल, डिझायनर्स व कन्सलटंटने या स्पर्धेत सहभागी होऊन नव्या संकल्पना मनपाला सादर कराव्या. यासाठी पहिल्या विजेत्याला 25 हजार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 21 हजार व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 17 हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.
कॉफी विथ मेयर या स्पर्धेतील विजेत्यांसोबत नागपूर शहराच्या प्रथम नागरिक माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्यासोबत कॉफी विथ मेयर या कार्यक्रमात या संकल्पनेबाबत चर्चा करण्याची संधी विजेत्यांना मिळणार आहे. या अभिनव संकल्पनेत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, मनपाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना साकार करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच आपले डिजाईन eetrafficnmc01@gmail.com वर पाठवावे. नागपूरला अधिक 'स्मार्ट' आणि 'ग्रीन' बनवण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केले आहे.