नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.गुरूवार(ता.2) शोध पथकाने 41 प्रकरणांची नोंद करून 21,100 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.300 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून 3,200 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचेहॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स,सर्व्हिस प्रोव्हायडर, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000 रूपयांची वसुली करण्यात आली. रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे वयवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 1,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.स्टार लिंक बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. बिडवाई ड्राय क्लिनर्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.अव्हेल कॉनव्हेंट अँड हायस्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. एम.आर.व्ही कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. गुरू माउली यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. साई डेली निड्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. खोब्रागडे अनाज भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू.45,000 दंड वसुल केला.