अटलबिहारी वाजपेयी ई-लायब्ररी सभागृहात मा.शिक्षण समिती सभापती
Date : 02 Apr 2026
मा.शिक्षण सभापती यांनी मनपा शाळेतील मुख्याध्यापकांचे संवाद साधतांना सांगितले कि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यातर्फे काही विशिष्ट प्रयत्न झाले असल्यास त्याची आठवण करावी. व प्रत्येक विद्यार्थ्यांचे जिवण उंचावण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावेत. अशी अभिलाषा व्यक्त केली. तसेच खालील उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या.
Ø मनपातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश दयावयाचे आहेत. त्याकरीता विद्यार्थीनिहाय माहिती कार्यालयास दयावी. तसेच प्राप्त गणवेश वाटप करतांना विद्यार्थ्यांचे पालक निमंत्रित करुन त्यांना शिक्षण समितीच्या सदस्यामार्फत गणवेश व पाठयपुस्तक वितरीत करावे.
Ø मुख्याध्यापकांच्या खोलीसमोर हँगीग क्रॉप-ट साहित्य लावावे.
Ø मनपा शाळेतील नर्सरी, KG –I, KG-II / बालवाडी च्या विद्यार्थ्यांना आकर्षक अभ्यासक्रम असलेले पुस्तके देण्यात येणार आहे. तसेच ड्राईंग बुक व क्रॉप-ट साहित्य सुध्दा शाळांना देण्यात येईल.
Ø शाळेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात येईल. आठवडयातुन 1 दिवस प्रयेकी 2 झोनचे उपक्रम समाविष्ठ करण्यात येतील.
Ø पटसंख्या जास्त असलेल्या शाळांना विंगर बस उपलब्ध करुन देण्यात येईल.
Ø पटसंख्या वाढविणा-या शाळांना प्रोत्साहन देण्यात येईल.
Ø ज्या शाळेत सफाई कर्मचारी, चपराशी नाहीत त्यांनी मागणी पत्र सादर करावे. अश्या सुचना दिल्या.
या सभेला शिक्षणाधिकारी सौ.माधुरी काटकर, उप.शिक्षणाधिकारी सौ.सिमा खोब्रागडे, श्री.सुभाष उपासे सहा.शिक्षणाधिकारी व शाळा निरीक्षक उपस्थित होते. सभेचे संचालन श्री.प्रशांत टेभुर्णे यांनी केले.