मनपा शिक्षकांच्या एआय प्रशिक्षणास प्रारंभ
शिक्षकांना मिळणार 'जनरेटिव्ह एआय' आणि 'मायक्रोसॉफ्ट कोपायलट'चे धडे
Date : 04 Apr 2026
असे मिळाले शिक्षकांना प्रशिक्षण
'रोबोटेक्स इंडिया' यांच्या वतीने दिले जात असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना प्रामुख्याने 'जनरेटिव्ह एआय' आणि 'मायक्रोसॉफ्ट कोपायलट' सारख्या प्रगत डिजिटल टूल्सचा वापर करण्यास शिकवण्यात आले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षकांचे दैनंदिन प्रशासकीय काम अधिक सुलभ करणे आणि वेळेची बचत करणे, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. मनपा शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार आहे. शिक्षकांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि कोपायलट, एआय बायस, अध्यापन पद्धतीत एआयचा वापर, एआय सिक्युरिटी ब्रीच, विद्यार्थ्यांची हजेरी, निकालाची टक्केवारी काढणे आणि लॅपटॉप हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शिक्षकांना आता कमी वेळात अधिक आकर्षक शैक्षणिक साहित्य, नोट्स आणि पाठ तयार करता येणार आहेत. " >
मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी मध्ये 'इस्टॅब्लिशमेंट ऑफ मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एआय अकॅडमी फॉर स्किलिंग अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट' (EASE) आणि 'डेसिग्नेशन ऑफ नागपूर रिजनल हब' या उपक्रमांतर्गत हे २ एप्रिलपासून प्रशिक्षणवर्ग घेतल्या जात आहेत. प्रशिक्षणवर्गाला मनपाच्या शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा भेटदेत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णे, मुख्याध्यापक, इतर शिक्षकवृंद तसेच रोबोटेक्स इंडियाचे श्रीमती रेवती फणसे, श्री. मोहित वाकोडे यांच्यासह इतर उपस्थित होते.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी प्रशिक्षणादरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करून तिचा वापर आपल्या अध्यापनात करावा आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. "मनपा शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नयेत, यासाठी तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात एआय प्रशिक्षण ही शिक्षकांसाठी ही उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिक्षकांच्या ज्ञानात भर पडेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीतही या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल," असे मत श्रीमती वैष्णवी बी. यांनी व्यक्त केले.
असे मिळाले शिक्षकांना प्रशिक्षण
'रोबोटेक्स इंडिया' यांच्या वतीने दिले जात असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना प्रामुख्याने 'जनरेटिव्ह एआय' आणि 'मायक्रोसॉफ्ट कोपायलट' सारख्या प्रगत डिजिटल टूल्सचा वापर करण्यास शिकवण्यात आले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षकांचे दैनंदिन प्रशासकीय काम अधिक सुलभ करणे आणि वेळेची बचत करणे, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. मनपा शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार आहे. शिक्षकांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि कोपायलट, एआय बायस, अध्यापन पद्धतीत एआयचा वापर, एआय सिक्युरिटी ब्रीच, विद्यार्थ्यांची हजेरी, निकालाची टक्केवारी काढणे आणि लॅपटॉप हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शिक्षकांना आता कमी वेळात अधिक आकर्षक शैक्षणिक साहित्य, नोट्स आणि पाठ तयार करता येणार आहेत.