गरजू महिलांसाठी नवीन योजना तयार करा
सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांचे निर्देश
Date : 06 Apr 2026
यावेळी समितीच्या उपसभापती श्रीमती तारा यादव, समिती सदस्य नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, श्रीमती महेश्वरी बिसेन, श्रीमती रेखा निमजे, श्रीमती शिला तराळे, श्रीमती कल्पना द्रोणकर, कु. लक्ष्मी हत्तीठेले यांच्यासह समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समाज विकास विभागाचे श्री. विनय त्रिकोलवार, श्री. रितेश बांते, श्रीमती शारदा भुसारी, श्रीमती नुतन मोरे, श्री.रितेश बनसोड, यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सभेत सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांनी झोन मध्ये असलेल्या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी झोननुसार एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात याव्यात, व यात स्थानिक नगरसेविका तसेच पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी यांना निमंत्रित करण्यात यावे, असे सुचविले. तसेच गरजू, विधवा व घटस्पोटीत महिलांना शिवण यंत्रांचे वाटप करण्यासाठी योजना तयार करावी, स्लम मधील गरजू महिलांना वाहन चालक प्रशिक्षण देता येईल काय यावर चाचपणी करावी आणि महिला दिनानिमित्त महिलांसाठी व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. महिलांसाठी नवीन योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील काय, यासाठी अधिकारी आणि समितीच्या सदस्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात असेही असेही त्यांनी बैठकीत सूचविले.
सभेत सर्वप्रथम समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी महिलांकरिता मनपाच्या विविध झोनमधील समुपदेशन केंद्र, शाळेतील मुलीकरिता सॅनिटरी नॅपकिन, महिलांसाठी शिवणयंत्र योजना, झोन निहाय पोटोबा फूड स्टॉल, महिला उद्योजिका मेळावा, बेघर निवारा, मुलीसाठी उपस्थिती भत्ता, बालवाडीच्या मुलांकरिता पोषण आहार, मनपा शाळेत विज्ञान लॅबचे नूतनीकरण, 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश, जोडे-मोजे वाटप, विद्यार्थ्याकरिता नि:शुल्क बस पास सुविधा, एमएसआयसीटी प्रशिक्षण, सीईटी, जेईई प्रशिक्षण, सोलर प्रशिक्षण, शिवणयंत्र क्लस्टर तसेच दिव्यांगासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.