स्थापत्य विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार यांनी स्वीकारला पदभार
Date : 06 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या नवनिर्वाचित सभापती श्रीमती अश्विनी जयंत जिचकार यांनी आज सोमवार (ता.६) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली.
Back To Home Page
मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, नगरसेवक श्री. रामभाऊ आंबुलकर , माजी नगरसेवक श्री. रमेश सिंगारे, श्री.प्रभाकर येवले, नागपूर नागरिक सहकारी बँकचे अध्यक्ष श्री. संजय भेंड़े, श्री.सुनील मित्रा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रंसगी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे उपसभापती श्री.प्रदिप वसंतराव पोहाणे, कु. दुर्गेश्वरी कैलास कोसेकर. श्री.महेंद्र रमेश धनविजय, श्री.चंद्रकांत मनोहरराव खंगार, श्रीमती विद्या राजेश कन्हेरे, श्रीमती सुनिता दिपकराव तभाने आदी सदस्य उपस्थित होते.