विविध माध्यमातून शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवा
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समितीची बैठक संपन्न
Date : 06 Apr 2026
याप्रसंगी गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीचे उपसभापती श्री.संदीप रमेशराव गवई, सदस्य श्री.नागेश महादेव मानकर, श्री. योगिता धनराज तेलंग, श्री.हेमंत शांताराम बरडे, श्री.विवेक रमेश निकोसे, श्रीमती सुजाता विठ्ठलराव कोंबाडे, श्री.पवन बाळुजी कोये यांच्यासह मनपाच्या निगम सचिव तथा समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, उपअभियंता श्रीमती पुष्पा जोगे, कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण कोटांगले, कनिष्ठ अभियंता सचिन चामटे, कार्यकारी अभियंता श्री.सुनील उईके कार्यकारी अभियंता प्रतीक गजभिये, कार्यकारी अभियंता श्री.मंगेश गेडाम यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम नागपूर शहरात एकूण ३०१ अधिसूचित गलिच्छ वस्त्या असल्याची माहिती देण्यात आली तसेच शहरात सुरू असलेल्या रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सफाई कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणी योजना तसेच शबरी आदिवासी घरकुल योजना या संदर्भात चर्चा करण्यात आली. योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच घरकुल योजनेतील हप्ते वेळेत वितरित व्हावेत, यासाठी आवश्यक त्या त्रुटी दूर करून प्रक्रिया गतीमान करावी, असे मत सदस्य श्री. नागेश महादेव मानकर यांनी व्यक्त केले.
उपसभापती श्री. संदीप रमेशराव गवई यांनी सामाजिक संस्थांनी अधिक जबाबदारीने काम करीत नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करावे तसेच प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. झोननिहाय आयोजित शिबिरांमध्ये जनजागृतीसाठी पॅम्फ्लेटचे वितरण करून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यावर भर देण्याचेही सांगितले. याशिवाय, सध्याच्या परिस्थितीत अडीच लाख रुपयांत घर बांधकाम शक्य नसल्याने रमाई घरकुल अनुदानाची रक्कम वाढविण्याबाबत शासनाकडे निवेदन सादर करावे, अशी सूचना सदस्य श्री. विवेक रमेश निकोसे यांनी केली.