अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी स्वीकारला पदभार
Date : 06 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री.अंकित (भा.प्र.से) यांनी सोमवारी (ता.०६) पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी श्री. अंकित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत उपस्थित होते.
Back To Home Page
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री.अंकित (भा.प्र.से) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांची सदिच्छभेट घेतली. यावेळी महापौर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी श्री.अंकित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. अंकित हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या सन २०१९ बॅचचे अधिकारी असून महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणून पदभार स्वीकारला आहे.