वैद्यकीय विशेष समिती सभापतींनी दिली पाचपावली युपीएचसीला भेट
Date : 06 Apr 2026
मनपाच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी सोमवारी (ता. ०६) आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, बाळाभाऊ पेठ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरला भेट दिली. यावेळी त्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोल्ड रूमला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांनी उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
Back To Home Page
याप्रसंगी मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, आशीनगर झोनचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.