सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 47 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 07 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.मंगळवार(ता.7) शोध पथकाने 47 प्रकरणांची नोंद करून 17,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 11 प्रकरणाची नोंद करून 4,400 रूपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे वयवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 2,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Back To Home Page
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे.राघव रियल इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. कलकत्ता रोल बिरयानी सेंटर व मे.आदित्य भोजनालय यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. महादेव किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.लिटील मिलेनियम यांनी विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू.30,000 दंड वसुल केला.