सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 40 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 08 Apr 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. श्रीजा बिल्डकॉन लि यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.ट्रीबो द मेमॉर यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच प्रीतम तिडके यांनी जुनी इमारत पाडताना वायु प्रदूषण पसरविल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. ग्रीन वर्ल्ड यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे. एलाईट-II यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. दाउजी फुड्स हॉटेल यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अनिल किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. दीपचंद किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 दंड वसुल केला.