नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.बुधवार(ता.8) शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 40,500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 13,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचेहॉटेल ,सिनेमाहॉल, मंगलकार्यालये, कॅटरर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रूपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटींग चेंबर नसणे,चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. कर्मशियल कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच महालक्ष्मी किराणा स्टोर यांनी खुल्या भुखंडावर दुकानाचा कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.खेमुका रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे.हॉटेल निचीवन व मे. हॉटेल डाउन हाउस यांनी डिसेलटींग चेंबर नसल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 याप्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजा ज्ञानस्त्रो केंद्र यांनी अनधिकृतरित्या भुखंडावर कचरा जाळल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत पवन बरडे यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. हॉटेल न्यू आनंद फरसाण व मे. सचिन बार अँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. यजनेश स्टडी सर्कल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. सहारे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.