नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.शुक्रवार(ता.10) शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 29,600 रुपयाचा दंड वसूल केला.सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 26 प्रकरणांची नोंद करून 10,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचेहॉटेल,सिनेमाहॉल,मंगलकार्यालये,कॅटरर्स,सर्व्हिसप्रोव्हायडर,
इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतुहीचा रस्ता मंडप,कमान,स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 9,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे.श्रीनिवास होम मेकर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.रोगडी डोसा यांनी अनाधिकृतरित्या भुखंडावर कचरा जाळल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. किर्ती स्वीट अँड नमकीन यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राधिका स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले.मंगळवारी झोन अंतर्गत मे. मॅप अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू.30,000 दंड वसुल केला.