महापौरांच्या हस्ते जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचा सत्कार
Date : 13 Apr 2026
दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू कु. ईश्वरी पांडे हिने सुमारे 38 किमीची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते कु. ईश्वरी पांडे यांचा सत्कार करण्यात आला.
Back To Home Page
दृष्टिहीन जलतरणपटू कु. ईश्वरी पांडे अथांग समुद्रावर विजय मिळवीत स्वगृही नागपूरला परतली, या निमित्त मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी कु. ईश्वरी पांडे आणि वडील श्री. कमलेश पांडे यांचा मनपाचा मनाचा दुपट्टा आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर उपस्थित होते.
कु. ईश्वरी पांडे यांनी श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुषकोडी ही 38 किलोमीटरची आव्हानात्मक पाल्क सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करीत विश्वविक्रम प्रस्थापित केला. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी ईश्वरी हिचे मनःपूर्वक अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.