नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार व सोमवार (ता.12 व 13) शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 33,100 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून रू.500 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रुपयाची वसुली करण्यात आली.दवाखाने ,इस्पितळे पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करण्यात आली.चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 9,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शशांक अनिल पवानी यांनी परवानगीशिवाय रस्ता खणल्याने व ट्रकने चेंबर तोडल्याने रू. 15,000 चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे.ओमकार रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत सोहम पवार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. प्लाझा बार अँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. समा्रट हॉस्पीटल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. हटवार किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत शुभम रेहपाळे यांनी ट्रकने चेंबर तोडल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.डॉ.प्रांजल पब्लिक स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. क्रिएशन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.60,000 दंड वसुल केला.