अग्निशमन सेवा अधिक सक्षम करणार : महापौर श्रीमती निता ठाकरे
मनपा मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस साजरा शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार
Date : 14 Apr 2026
मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, एआयएमआयएमचे गट नेते श्री शकील पटेल, श्री. अभिजीत झा, श्री. विनोद कन्हेरे, नगरसेविकास श्रीमती माधुरी टेकाम, श्रीमती योगिता तेलंग, श्री. सिरजुदीन अन्सारी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. मंगेश खवले, श्री. निर्भय जैन, श्री. अशोक गराटे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते उपस्थित होते.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अग्निशमन सेवा दिवसानिमित्त सर्वप्रथम जनतेच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन केले. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळया ठिकाणी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करले या घटनेतील अग्निशमन योद्धांच्या कार्याला त्यांनी मनपाच्या वतीने सलाम आणि जवनांच्या स्मृतीला वंदन केले. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे २२ अग्शिनमन केंद्रांचा मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. शिवाय अग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याकरिता मनुष्यबळाची भरती करून विभागाला बळकट करण्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी महापौर श्रीमती निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यापर्ण करीत अभिवादन केले. त्यानंतर शहीद अग्निशमन जवानांना स्मृती चिन्हाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. पुढे त्यांनी अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले.
यावेळी कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातर्फे अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. भगवान वाघ, लकडगंज अग्निशमन केंद्रातर्फे श्री. दिलीप चव्हाण, त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्रातर्फे सुरेश आत्राम यांनी परेड पथ संचलन करीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांना मानवंदना दिली.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आपत्कालीन घटनांवर नियंत्रण आणण्याचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या औचित्य साधून मनपाच्या अग्निशमन विभागाने तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. यात राष्ट्रीय तसेच शहरातील शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेण्यात आली.
चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
यावेळी टॅक्टिकल मिडले ड्रिल, टीटीएल ड्रिल, ऑइल फायर ड्रील, व्हेरीयर ब्रँचेस व जेट डेमोस्टेशन ड्रिल आणि 32 मीटरच्या हायड्रोलिक प्लॅटफार्म ड्रिल आयोजित करण्यात आले. बँड पथकाचे नियोजन श्री. प्रकाश कलसीया यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व आभार अग्निशमन विभागाचे उपायुक्त श्री. अशोक गराटे यांनी मानले.
शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त
अग्निशमन दलात कर्तव्य बजावताना हुतात्मा पत्करणाऱ्या शहीद जवान गुलाबरावजी कावळे, प्रभु कुहीकर, आणि शहीद रमेश ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनाचा मनपाचा मनाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह व तुळशी रोपटे देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शहीद गुलाबरावजी कावळे यांचे सुपुत्र श्री शैलेश कावळे, शहीद प्रभु कुहीकर यांच्या पत्नी श्रीमती चंद्रिका कुहीकर, आणि शहीद रमेश ठाकरे यांच्या पत्नी शांताबाई ठाकरे यांनी सन्मान स्वीकारला.
अग्निशमन जवानांचा सत्कार
शहरातील विविध भागात आलेल्या अतिवृष्टी व आपत्तीदरम्यान जिवीत हानीपासून नागरिकांना सुखरुप बाहरे काढून सुरक्षितता प्रदान केली अशा उल्लेखनीय कार्याबद्दल विभागीय अधिकारी व कर्मचारी यांना मनपाचा मानाचा दुपट्टा, प्रशस्तीपत्र, देऊन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते खालील जवांनाचा सत्कार करण्यात आला. यात अग्निशमन विभागातील खालील अधिकारी व जवानांचा समावेश आहे.
श्री. अकलीम शेख- प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी
श्री. सुरेश बिनेकर-उप अग्निशमन केंद्र अधिकारी
श्री. राजू पवार –प्रमुख अग्निशमन विमोचक
श्री. योगेश खोडके -अग्निशमन विमोचक
स्व. सुनिल समरीत यांचे पुत्र –लॉरी ड्रायव्हर
श्री. राजेश कारमोरे- सफाई कर्मचारी
श्री. सुरेश आत्राम- प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी
श्री. रविंद्र मसरकोल्हे –प्र. उप अग्निशमन केंद्र अधिकारी
श्री. दिनेश देवकते - कंत्राटी अग्निशमन विमोचक
श्री. गौरव शंकर कांबळे- कंत्राटी अग्निशमन विमोचक
श्री.बबन जाधव- चालक यंत्र चालक
श्री. निलेश देठे- कंत्राटी अग्निशमन विमोचक
श्री. सौरभ चौधरी – (आरोग्य विभाग)
श्री अजय ठवकर - कंत्राटी अग्निशमन विमोचक
श्री. रिंकु कुहीकर- कंत्राटी अग्निशमन विमोचक